कारमधून बनावट दारूची तस्करी ; ५ लाखाच्या मुद्देमालासह एकजण ताब्यात

कोल्हापूर :- दारूची चोरून लपून तस्करी अधूनमधून सुरूच असल्याचे वारंवार समोर आले आहे. यातच कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा बनावट दारूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोड्यातील डॅरेल फर्नांडिस याला राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
कोल्हापुरातल्या हॉकी स्टेडियम परिसरातील आयसोलेशन हॉस्पिटल समोर करण्यात आली अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली आहे. कारमधून दारूची तस्करी होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचत सदरची कारवाई केली आहे. सदरच्या कारवाईत एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
१० लाखाचा मुद्देमाल हस्तगत
कारवाई दरम्यान पाच लाख रुपयांचे गोवा बनावटीच्या दारूचे ७५ बॉक्स आणि ५ लाखाची कार असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान ही दारू कोणासाठी घेऊन निघाला होता; याचा देखील शोध आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी घेत आहेत.



