socailnews

  • Amravati

    विद्यापीठात श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

    अमरावती – (दि. 08.12.2025) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात महाराष्ट्राच्या संत परंपरेतील थोर संत श्री संत संताजी जगनाडे महाराज…

    Read More »
  • Amravati

    अमरावतीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी

    अमरावती – ६ डिसेंबर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. देशभराप्रमाणेच अमरावतीतही या दिवसाचे औचित्य साधत इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब…

    Read More »
  • Latest News

    डॉ. सुभाष शंकरराव बोबडे अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव यांना ‘लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’

    शैक्षणिक, सामाजिक आणि एनसीसी क्षेत्रातील बहुमोल कार्याचा बहुमान खामगाव – शिक्षण क्षेत्रातील अढळ निष्ठा, संस्थाविकासातील दूरदृष्टी, व्यवस्थापनातील प्रामाणिकता आणि तरुण पिढीतील नेतृत्वगुण जागविण्यासाठी केलेल्या असामान्य कार्याचा गौरव म्हणून विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षणप्रेमी डॉ. सुभाष शंकरराव (दादासाहेब) बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांना प्रतिष्ठेचा ‘लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगाव यांच्या वतीने हा बहुमोलाचा अवॉर्ड जाहीर झाला आहे. एनसीसीच्या एका कार्यक्रमात अत्यंत प्रतिष्ठेचा हा अवॉर्ड कर्नल ओमेश शुक्ला, कमान्डिंग ऑफिसर, १३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने केवळ एका प्रतिष्ठित व्यक्तीचा सन्मान झालेला नाही, तर शिक्षण संस्थेच्या उभारणीत आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी केलेले अतुलनीय कार्य समाजापुढे एक आदर्शमूल्य ठरले आहे. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षण क्षेत्राला एक उंच दिशा दिली. आर.सी.एफ. गुजरात येथे चीफ मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्य करताना प्रामाणिकता, शिस्त, नियोजन आणि व्यवस्थापन या मूल्यांची त्यांनी जपणूक केली. २००१ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्यावर विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. शिस्त, प्रामाणिकपणा आणि नियोजनात्मक कार्य यांची बांधणी ही त्यांची जीवनमूल्ये आहेत. अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आणि आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केले. गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी रचनात्मक विकासाचा पाया मजबूत केला आणि अनेक भव्य प्रकल्प महाविद्यालयासाठी साकारले. महाविद्यालयाचा स्विमिंग पूल आणि इनडोअर स्टेडियम या महत्त्वाकांक्षी योजनांची उभारणी ही त्यांची दूरदृष्टी आणि शिस्तबद्ध कामगिरीची उत्तम उदाहरणे आहेत. या सुविधा आजही हजारो विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महाविद्यालय परिसराचे आधुनिकीकरण, सुशोभीकरण, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा विस्तार, शैक्षणिक गुणवत्तेचा सातत्याने होणारा विकास यामागे त्यांचे सूक्ष्म नियोजन आणि अथक परिश्रम जाणवतात. याच काळात महाविद्यालयाला मिळालेला NAAC चा ‘A’ दर्जा हा त्यांच्या शिक्षणावरील दांडगा अभ्यास आणि संस्थेवरील प्रेमाची पावती मानला जातो. ११ फेब्रुवारी २०१९ रोजी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी संस्था आधुनिक करण्याचा आणि विद्यार्थी–शिक्षकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा उपक्रम राबविला. स्व. नरेंद्र शंकरराव बोबडे यांच्या पश्चात विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव च्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना त्यांनी संस्थेमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि विकासाचा नवा अध्याय सुरू केला. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या विस्ताराबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, संस्था–विद्यार्थी–शिक्षक यांच्यात संवाद व समन्वय साधणे ही कामे त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडली. विशेष म्हणजे, वयाची सत्याहत्तर वर्षे ओलांडूनही दररोज सकाळी टेनिस कोर्टवरील त्यांची जोशपूर्ण उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यांच्या चालण्यात, बोलण्यात, काम करण्याच्या पद्धतीत आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीतून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित करते. ते आदर्श मार्गदर्शक, उत्तम प्रशासक आणि दृढनिश्चयी नेता म्हणून ओळखले जातात. लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड स्वीकारताना एनसीसी अधिकाऱ्यांनी त्यांची मनःपूर्वक प्रशंसा केली. एक प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा ‘शिक्षण योद्धा’ म्हणजे दादासाहेब बोबडे, असे कर्नल ओमेश शुक्ला यांनी या प्रसंगी गौरवोद्गार काढले. त्यांनी पुढे म्हटले की, डॉ. बोबडे यांनी तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय भावना जागविण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. एनसीसी उपक्रमांना त्यांनी नेहमीच मोलाचा पाठिंबा दिला. त्यांच्या प्रेरणेतून अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करत आहेत. त्यांचे कार्य हे पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ आहे. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांनी एनसीसी कॅडेट्सच्या प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्यातील स्वानुशासन, जबाबदारी आणि राष्ट्रीय मूल्ये दृढ केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला ते नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देत आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विभागाने अनेक उपक्रम राबविले असून, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये उत्तम चारित्र्य आणि राष्ट्रसेवेचे मूल्य बळकट झाले आहे. या गौरवामुळे खामगाव शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभूतपूर्व आनंद व्यक्त होत असून, डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा पुरस्कार विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळासाठीही एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. या ‘लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’बद्दल विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावचे उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट, सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, कोषाध्यक्ष मा. अजिंक्यदादा बोबडे, निसर्ग ग्रुप खामगावच्या अध्यक्षा सौ. निताताई बोबडे, सौ. श्रद्धाताई बोबडे तसेच मंडळाचे सर्व माननीय सदस्य यांनी डॉ. बोबडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन परिवारानेही त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. “त्यांचे विचार आमच्या प्रत्येक कार्याला दिशादर्शक ठरतात आणि आम्हाला कायम प्रेरणा देतात,” असे प्राचार्यांनी याप्रसंगी सांगितले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

    Read More »
  • amravatinews

    दिशा इंटरनॅशन आय बँक अमरावती मध्ये स्व. भैय्यासाहेब ऊर्फ श्री. हेमचंद्र जयवंतराव बोंडे यांचे नेत्रदान

    साऊर, अमरावती येथील रहिवासी स्व. भैय्यासाहेब ऊर्फ श्री. हेमचंद्र जयवंतराव बोंडे (७८) यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. बोंडे परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत बोंडे परिवाराने स्व. श्री. हेमचंद्र जयवंतराव बोंडे यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, bश्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एज्युकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे बोंडे कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. बोंडे परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात बोंडे परिवारातील श्री. शशिकांत बोंडे, श्री. उदय बोंडे, डॉ. आनंद उल्हे व बोंडे परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. भैय्यासाहेब ऊर्फ श्री. हेमचंद्र जयवंतराव बोंडे यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

    Read More »
  • Latest News

    सिटी_न्यूज मराठी बातमीपत्र १ मे २०२५

    सिटी_न्यूज मराठी बातमीपत्र १ मे २०२५

    Read More »
  • Latest News

    रणरणत्या उन्हात पक्षांना वाचविण्यासाठी प्राणी मित्रांची धडपड

    तिवसा : सध्यास्तीतीत रखरखत्या उन्हाळ्याला सुरुवात झाली विहीरी, तलाव, कोरडे पडू लागले असून गावानजीक असणाऱ्या जगलातील पानवटे देखील आटायला लागले…

    Read More »
Back to top button