socailnews

  • Latest News

    पुस्तक दुनिया का सबसे बड़ा मित्र है : डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’

    महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय में पूर्व केंद्रीय शिक्षा मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ के हस्ते राष्ट्रीय पुस्तक मेले का…

    Read More »
  • Amravati

    विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळाव्याचे 24 जानेवारी रोजी भव्य आयोजन

    अमरावती : –   संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठ परिसरातील विवेकानंद भवन येथे दि. 24 जानेवारी रोजी विद्यापीठाच्या माजी…

    Read More »
  • Amravati

    आहार प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …. विद्यापीठातील गृह विज्ञान विभाग व झेनिथ हॉस्पिटलचे संयुक्त आयोजन

    अमरावती (दि. 06.01.2026) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गृहविज्ञान विभाग व अमरावती शहरातील प्रसिध्द झेनिथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

    Read More »
  • Amravati

    स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक मध्ये नेत्रदान

    माजी पालकमंत्री व आमदार डॉ. सुनिल देशमुख, श्री प्रतापराव देशमुख व श्री अनिल देशमुख यांच्या मातोश्री स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. देशमुख परिवाराने या दुःखद प्रसंगात देखील सामाजिक जाणीव लक्षात घेऊन गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने त्यांच्या मातोश्री स्व. श्रीमती प्रतिभाताई पंजाबराव देशमुख यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले. दिशा ग्रुपचे संस्थापक सचिव श्री स्वप्निल अरुण गावंडे, दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे श्री हिमांशू प्रमोद बंड, श्री अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मरनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केलाबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे, सचिव स्वप्निल अरुण गावंडे, मेडिकल डिरेक्टर डॉ मनिष तोटे, डॉ अंकित हरवानी द्वारे देशमुख कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. या सेवाभावी कार्यात देशमुख परिवारातिल श्री. प्रतापराव देशमुख, डॉ. सुनिल देशमुख, श्री. अनिल देशमुख, डॉ. सोनाली देशमुख, श्री अंगद देशमुख, सौ गौरी देशमुख व देशमुख परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्रीमती प्रतिभा पंजाबराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पित करणात आली. भारतासमोर बुबुळा मुळे अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एक व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा इत्यादी आजार असलेले व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते. चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यू नंतर नेत्रदानासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे मृत्यू नंतर सहा ते आठ तसा पर्येंत नेत्रदान केला जाऊ शकते. त्यामुळे मृत्युपच्यात ताबडतोप दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्या खाली २ उश्या ठेवावा. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेऊ शकता. व मृत्यूच्या करणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरान कडून घेऊन घ्यावे. मरणोत्तर नेत्रदानासाठी संपर्क करा मो. 7378656145, 7378656144, 9899898667

    Read More »
  • Latest News

    सावित्रीबाई फुले शिक्षकांचे आदर्श – डॉ. श्रीकांत पाटील

    अमरावती : गेल्या दीडशे वर्षात भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असून अगदी अंतराळ क्षेत्रातही भरीव योगदान देतांना महिलांची कर्तबगारी सर्वश्रूत…

    Read More »
  • Amaravti Gramin

    गो. से. महाविद्यालयात “जागर स्त्री–पुरुष समानतेचा” सप्ताहाचा भव्य शुभारंभ

    “स्त्री–पुरुष समानता प्रत्यक्ष कृतीतूनच साकार होईल” – सौ. श्रद्धाताई बोबडे खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या वतीने आयोजित “जागर स्त्री–पुरुष समानतेचा” सप्ताह (दि. ३ ते १२ जानेवारी २०२६) चा भव्य उद्घाटन समारंभ दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या विशेष सप्ताहाचे उद्घाटन मा. डॉ. गीताली पुंडकर (प्राचार्या, कला महाविद्यालय, अकोला–मलकापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (संचालिका, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), डॉ. कांचनताई थोरात (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मलकापूर) तसेच नयन काळमेघ (गृहअर्थशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, अकोला–मलकापूर) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक पडघन होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. रेश्मा मारवाडी यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्त्री–पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण, स्वावलंबन व सामाजिक जागृती या अत्यंत महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत सावित्रीबाई फुले जयंती, माँ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती या प्रेरणादायी दिनांचे औचित्य साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध स्पर्धा, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम, शिवणकला व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, उद्योजकता मार्गदर्शन व्याख्यान, पथनाट्य, जी. एस. पतंगोत्सव तसेच विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. उद्घाटक डॉ. गीताली पुंडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्त्री– पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण व शिक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी आपल्या विशेष भाषणात सांगितले की, स्त्री–पुरुष समानता ही केवळ संकल्पना नसून ती प्रत्यक्ष कृतीतून समाजात रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांना शिक्षण, संधी व सुरक्षित वातावरण मिळाल्यास त्या कुटुंब, संस्था आणि समाजाच्या प्रगतीसाठी प्रभावी योगदान देऊ शकतात. विद्यार्थिनींनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, तर विद्यार्थ्यांनीही समानतेचा दृष्टिकोन अंगीकारून महिलांच्या प्रगतीला साथ द्यावी, असे त्यांनी प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक पडघन यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नेतृत्वगुण विकसित करावेत तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारावा, असे मार्गदर्शन केले. हा सप्ताह विद्यार्थ्यांमध्ये व विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेश्मा मारवाडी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूनम तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कोमल काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संगीता वायचाळ, डॉ. नीता बोचे, डॉ. रोहिणी धरमकर, कु. भाग्यश्री सापधारे, श्री. अभय मोहिते, श्री. विठ्ठल चंदनकर, श्री. लक्ष्मण पालवे, श्री. अरविंद लांडे, सौ. स्वाती खोडके, शारदा इंगळे, अंजली करंगळे, पूजा बोचरे, ऋतुजा वानखडे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच दीक्षा खोडे या विद्यार्थिनीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

    Read More »
  • Amravati

    रा. से. यो. अंतर्गत गो. से. महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

    खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई…

    Read More »
  • Amravati

    संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

    अमरावती – क्रांतीकारी समाजसेविका, भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्त्री अभ्यास…

    Read More »
  • Akola

    स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण (वय ३७) यांचे दिशा इंटरनॅशनल आय बँक अमरावती मध्ये नेत्रदान

    मु. सावंगा (मेध), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील रहिवासी स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण (वय ३७) यांचे दुःखत निधन झाले. कुटूंबातील व्यक्तीच्या निधनामुळे कुटूंबियांना दुःख होणे स्वाभाविक असते. चव्हाण परिवारावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळले परंतु अशाही परिस्तितीत गरजूंना या जगातील रंग पाहता येतील या उद्दात भावनेने चव्हाण परिवाराच्या सदस्यांनी स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अमरावती मधील दिशा ग्रुप व दिशा एज्युकेशन फाऊंडेशन द्वारा संचालित दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क केला. दिशा ग्रुपचे सचिव श्री. स्वप्निल अरुण गावंडे, दिशा आय बँकेचे डेप्युटी मेडिकल डिरेक्त्तर डॉ. अंकित अनिल हरवानी, श्री. हिमांशू प्रमोद बंड, श्री. अनिल सदाशिवराव देशमुख यांनी मारनोतर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या अध्यक्षा सौ. कुंदा अरुण गावंडे व सचिव स्वप्निल अरुण गावंडे द्वारे चव्हाण कुटुंबियांचे आभार व्यक्त करणात आले. चव्हाण परीवाराला नेत्रदान केल्या बद्दल मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंतर्गत नेत्रदानाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेवाभावी कार्यात चव्हाण परिवारातील श्री. दशरथ चव्हाण, श्री. शामराव चव्हाण, श्री. प्रकाश सोळंके व चव्हाण परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दिशा ग्रुप व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांतर्फे स्व. श्री. मंगेश दशरथ चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजार असलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या आणि पंखा बंद ठेवावा तसेच ए.सी. असेल तर सुरु ठेऊ शकता.

    Read More »
  • Amravati

    विद्यापीठात पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन जयंती साजरी

    अमरावती – (दि. 28.12.2025) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात स्वातंत्र्य संग्राम सेनानी, जेष्ठ कुष्ठसेवक पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन…

    Read More »
Back to top button