‘संवाद से हर समस्या का संवाद होता है’ : आचार्य देवेंद्र जैन महाराज

देहरादूनमध्ये ‘संवाद से समाधान’ उपक्रमाचे आयोजन; सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकात्मता आणि वैश्विक सद्भावाचा संदेश
देहरादून | ४ ऑगस्ट २०२६
समाजात वाढत चाललेल्या वैचारिक आव्हानांवर संवादाच्या माध्यमातून सकारात्मक मार्ग शोधण्याच्या उद्देशाने महावीरायतन फाउंडेशनच्या ‘संवाद से समाधान’ या राष्ट्रीय उपक्रमाची पुढील कडी ४ ऑगस्ट २०२६ रोजी उत्तराखंडमधील देहरादून येथील लोक भवन येथे आयोजित करण्यात आली. ‘संवाद से हर समस्या का संवाद होता है’, असा संदेश आचार्य देवेंद्र जैन महाराज यांनी यावेळी दिला.
भगवान महावीर यांच्या शाश्वत तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेतलेला ‘संवाद से समाधान’ हा केवळ एक कार्यक्रम नसून संवाद, सहअस्तित्व, सामाजिक समरसता आणि मानवी मूल्यांवर आधारित राष्ट्रीय जनअभियान असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
‘जियो और जीने दो’चा संदेश
‘जियो और जीने दो’ तसेच ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या सार्वत्रिक संदेशांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. संवाद, सहकार्य आणि सामूहिक चिंतनातून सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील समकालीन आव्हानांवर सकारात्मक व दीर्घकालीन उपाय शोधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
‘सशक्त भारत, समृद्ध भारत’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, संत-महात्मे, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि युवा प्रतिनिधींना या उपक्रमाशी जोडण्यात येत आहे.
२०२५ पासून देशभर उपक्रम
‘संवाद से समाधान’ या कार्यक्रम मालिकेची सुरुवात २०२५ मध्ये झाली. त्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये या उपक्रमांतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमांमध्ये भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, संत-महात्मे, शिक्षणतज्ज्ञ, न्यायविद, उद्योगपती तसेच देश-विदेशातील मान्यवरांनी सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले.
समाज, राष्ट्र आणि मानवतेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विविध कार्यक्रमांमध्ये सन्मान करून सेवा, समर्पण आणि लोककल्याणाच्या भावनेला प्रोत्साहन देण्यात येते. या कार्यक्रमाला सुदर्शन डांगी यांचीही उपस्थिती होती.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग
देहरादून येथील कार्यक्रमाला उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह (सेवानिवृत्त) यांचे प्रमुख आतिथ्य लाभले. महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी राज्यपाल तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते.
याशिवाय ऋषिकेश येथील स्वामी जगन्नाथ आश्रमाचे पीठाधीश्वर महंत लोकेश दास महाराज यांचेही पावन सान्निध्य लाभले.
संत-महात्मे, शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, सामाजिक नेतृत्व, युवा प्रतिनिधी तसेच देश-विदेशातील प्रबुद्ध व्यक्तींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
सामाजिक समरसता आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्य
महावीरायतन फाउंडेशन ही सामाजिक, आध्यात्मिक आणि जनकल्याणकारी संस्था असून संवाद, सेवा आणि संस्कारांच्या माध्यमातून सामाजिक समरसता, मूल्याधिष्ठित शिक्षण, सांस्कृतिक जागृती, पर्यावरण संरक्षण, युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रनिर्माणासाठी कार्यरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
संस्थेचे संस्थापक स्वामी देवेंद्र ब्रह्मचारी गेल्या दोन दशकांपासून भगवान महावीर यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता, सांस्कृतिक जागृती आणि मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सकारात्मक बदल, नैतिक जाणीव आणि जनसहभागाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘एक भारत–समरस भारत–सशक्त भारत’चा संकल्प
कार्यक्रमात विचारमंथन, सांस्कृतिक सादरीकरण आणि सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून संवाद, विश्वास, सद्भाव आणि सहअस्तित्वाच्या संस्कृतीला बळ देण्याचा संदेश देण्यात आला.
“जेव्हा संवाद संस्कारांशी जोडला जातो, तेव्हा समाधान केवळ समाजाच्या प्रश्नांचे राहत नाही, तर संपूर्ण मानवतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग निर्माण करतो,” असा विश्वास महावीरायतन फाउंडेशनकडून व्यक्त करण्यात आला.
भगवान महावीर यांचा ‘जियो और जीने दो’, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासोबतच ‘एक भारत–समरस भारत–सशक्त भारत’ हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.



