Uncategorized

नागपुरात 30 लाखांची एमडी पावडर जप्त 43 लाखांचा मुद्देमाल दोन आरोपी अटकेत

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे.
वैष्णवी देवी नगर परिसरातील विस्टा टॅटू स्टुडिओजवळ संशयाच्या आधारे दोन संशयितांची एनडीपीएस कायद्यानुसार दोन पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. या झडतीत आरोपींकडून सुमारे १५१ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत ३० लाख २० हजार रुपये आहे. याशिवाय दोन मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, रोख रक्कम, एक होंडा सिटी कार आणि एक सुझुकी अॅक्सेस दुचाकीसह एकूण ४३ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात मोहम्मद नियाज समसूल अन्सारी आणि मोहम्मद असलम समसूल अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अटक आरोपींपैकी एकावर यापूर्वी एनडीपीएस कायद्यांतर्गत तर दुसऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील विशाल उर्फ फल्ली गुप्ता हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा आणि आर्म्स अॅक्टसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कारवाईसाठी भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button