जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना
अमरावती | प्रतिनिधी
महान योद्धा आणि मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले.
महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला संघर्ष आणि त्याग आजही प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने आणि नव्या पिढीने जपावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जयंतीनिमित्त आयोजित या अभिवादन कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.



