AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत अनुभवला ‘झीरो शॅडो डे’; काही क्षणांसाठी सावल्या झाल्या गायब

आज अमरावती शहरात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक खगोलीय घटना अनुभवायला मिळाली आहे. दुपारी ठीक १२ वाजण्याच्या सुमारास अमरावती शहरात “झीरो शॅडो डे” म्हणजेच “शून्य सावली दिवस” पाहायला मिळाला.

इरविन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक आणि मसानगंज परिसरात नागरिकांनी स्वतःच्या डोळ्यांनी हा अद्भुत क्षण अनुभवला. जिथे काही क्षणांसाठी माणसांची सावलीच नाहीशी झाल्यासारखी दिसली.

२५ मे २०२६ हा दिवस अमरावती शहरासाठी एक अविस्मरणीय दिवस ठरला. दुपारी साधारण १२ वाजता शहरात “झीरो शॅडो डे”चा अद्भुत खगोलीय नजारा पाहायला मिळाला.

चालत असलेल्या नागरिकांच्या पायाखाली सावली दिसत नव्हती, तर उभ्या असलेल्या वस्तूंची सावलीही पूर्णपणे नाहीशी झाली होती. अनेक नागरिकांनी हा अनुभव प्रत्यक्ष पाहत आश्चर्य व्यक्त केले.

वैज्ञानिक माहितीनुसार, जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर ९० अंशात म्हणजेच Zenith स्थितीत असतो, तेव्हा सूर्यकिरण थेट जमिनीवर लंबवत पडतात. अशावेळी वस्तूंची सावली त्यांच्या पायाखालीच तयार होते आणि ती दिसत नाही.

पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशांनी झुकलेला असल्याने आणि सूर्याभोवतीच्या परिक्रमेमुळे वर्षभर सूर्याची स्थिती बदलत राहते. त्यामुळे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यामधील प्रदेशांमध्ये वर्षातून दोनदा ही दुर्मिळ घटना घडते.

अमरावती शहरात सुमारे ५२ सेकंद हा अद्भुत क्षण नागरिकांनी अनुभवला. मोबाईल कॅमेऱ्यात अनेकांनी हा नजारा कैद केला आणि सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

खगोलशास्त्र आणि विज्ञानाची आवड असलेल्या नागरिकांसाठी हा अनुभव विशेष आकर्षणाचा ठरला. अनेक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष निरीक्षण करत या दुर्मिळ घटनेचा आनंद घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button