Accident NewsLatest NewsYavatmal

कुलरचा करंट ठरला जीवघेणा! १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील शिरोली गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून कुलरमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहामुळे अवघ्या १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वराज सुरज उले असे मृत बालकाचे नाव असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरात खेळत असताना लहानगा स्वराज कुतूहलापोटी कुलरजवळ गेला. त्याने कुलरच्या पाण्याच्या टाकीत हात टाकताच कुलरमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाचा त्याला जोरदार शॉक बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरून गेले. त्यांनी तातडीने कुलरचा वीजपुरवठा बंद करून स्वराजला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे उले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शिरोली गावात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत कुलर, पंखे आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर वाढत असताना पालकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. घरातील विद्युत उपकरणांची नियमित तपासणी, सुरक्षित वायरिंग आणि लहान मुलांना अशा उपकरणांपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचेही या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button