आंबेडकर जयंतीपूर्वी अमरावतीत पोलिसांचा रूट मार्च! शांततेसाठी प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत.
१४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाच्या अनुषंगाने ९ एप्रिल रोजी गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या रूट मार्चमध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरातून हा मार्च काढत नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे —
👉 कोणताही अनुचित प्रकार सहन केला जाणार नाही
👉 कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल
यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत उत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करण्याचे आवाहन केले.
अमरावती पोलिसांनी आधीच कडक तयारी करत नागरिकांना स्पष्ट संदेश दिला आहे —
“जयंती साजरी करा… पण शांततेत आणि शिस्तीत!”
📺 अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज



