citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये ‘ऑपरेशन थंडर’चा मोठा भंडाफोड! किराणा दुकानातून सुरू होता नशेचा काळाबाजार — ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साध्या किराणा दुकानाच्या आड बेकायदेशीर ई-सिगारेट आणि विदेशी सिगारेटची विक्री सुरू असल्याचा मोठा खुलासा पोलिसांनी केला आहे. ही कारवाई हरदी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत जवळपास ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बंदी असलेल्या ई-सिगारेट, विदेशी सिगारेट आणि इतर व्यसनाधीन करणारे पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळले.

या प्रकरणात मुकेश चौव्हाण (कर्मचारी) आणि हरीश, विकास व जगदीश परसवानी या तीन भावांचा समावेश असून, ते मिळून हा बेकायदेशीर व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी सापळा रचून आरोपींना मेडिकल चौक परिसरात रेडहँड पकडले, तेव्हा ते मोपेड आणि चारचाकीतून मालाची डिलिव्हरी करण्याच्या तयारीत होते. त्यांच्या ताब्यातून सुमारे १.९७ लाखांचे ई-सिगारेट पॅकेट्स आणि ८० हजारांचे विदेशी सिगारेट (इशारा नसलेले) जप्त करण्यात आले.

प्राथमिक तपासात हा माल मुंबई आणि हरियाणा येथून पुरवला जात असल्याचा अंदाज असून, पोलिस आता या संपूर्ण रॅकेटच्या मुळाशी पोहोचण्यासाठी तांत्रिक तपास करत आहेत. ग्राहकांमध्ये पानटपरी व्यावसायिकांपासून ते तरुणांपर्यंत मोठे नेटवर्क असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, पालकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली, कारण विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये ई-सिगारेट सापडत असल्याचे उघड झाले होते.

ही कारवाई केवळ सुरुवात असून, नागपूर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे —
👉 नशेचा अवैध धंदा करणाऱ्यांना कोणतीही सूट नाही!

📺 नागपूरमधील या मोठ्या कारवाईवर आणि पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button