citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

रामटेकमध्ये धक्कादायक घटना! तीळभांडेश्वर मंदिरावर वीज कोसळली; घुमटाचे नुकसान, मोठी दुर्घटना टळली

रामटेक | प्रतिनिधी
रामटेक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसात ऐतिहासिक तीळभांडेश्वर मंदिरावर आकाशीय वीज कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान आझाद वॉर्डातील श्रद्धास्थान असलेल्या तीळभांडेश्वर मंदिरावर वीज कोसळली. विजेचा कडकडाट इतका तीव्र होता की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आले.

या घटनेत मंदिराच्या वरच्या भागाला मोठे तडे गेले असून घुमटाचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मंदिरातील विद्युत यंत्रणा पूर्णपणे जळून खाक झाली असून भिंतींवरील वायरिंगही उखडली गेली आहे.

सुदैवाने, ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यामुळे मंदिरात कोणीही उपस्थित नव्हते आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. सध्या प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

तीळभांडेश्वर मंदिर हे रामटेकच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानले जाते. या घटनेमुळे मंदिराच्या संरचनेला धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांनी तातडीने दुरुस्ती व संवर्धनाची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

निसर्गाच्या या प्रकोपानंतर आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या मदतीकडे लागले आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button