AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती अत्याचार प्रकरणावर महिला काँग्रेस आक्रमक; आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

अमरावती : शहरातील १८ वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर महिला काँग्रेस आक्रमक झाली असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील भाणखेडा मार्गावर शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. काही आरोपींनी १८ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरले आहे.

या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीचे पोलीस उपायुक्त शाम घुघे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच निर्जन भागांमध्ये स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी तसेच अशा ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button