City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात आंतरराज्य चोरटा अटक; लॅपटॉप-मोबाईल चोरी टोळीचा पर्दाफाश, २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूरच्या कळमणा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य चोरट्याला अटक केली आहे. महागडे लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तब्बल २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१७ मार्च रोजी फिर्यादी समीर शेख हे कळमणा भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले असताना त्यांनी आपला मोबाईल मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवला होता. मात्र परत आल्यावर डिक्की तोडून मोबाईल चोरी झाल्याचे उघड झाले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.

१८ मार्च रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना विजय नगर परिसरात एक इसम चोरीचा माल विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. सापळा रचत पोलिसांनी आरोपी दिलीपबाबू रंगन याला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान आरोपीकडून ३ लॅपटॉप आणि ६ महागडे मोबाईल असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा तामिळनाडू येथील असून त्याला मराठी व हिंदी भाषा येत नसल्याने चौकशीसाठी भाषांतरकाराची मदत घेण्यात आली.

चौकशीत आरोपीने कळमणा मार्केटमधील चोरीसह राणाप्रताप नगर येथील आणखी एका चोरीची कबुली दिली आहे. या टोळीचा दुसरा सदस्य बालाजी गोविंदप्पा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिस तपासात ही टोळी आंतरराज्य पातळीवर कार्यरत असल्याचे समोर आले आहे. ही टोळी स्लम भागात भाड्याने राहून मार्केट, पार्किंग आणि फ्लॅट परिसरात चोरी करत होती. चोरी केलेला माल तामिळनाडू आणि कर्नाटक येथे विक्रीसाठी पाठवला जात असल्याचेही उघड झाले आहे.


कळमणा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आंतरराज्य चोरट्यांचा पर्दाफाश झाला आहे. मात्र या टोळीचा आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button