AmravatiLatest NewsSports

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 16.03.2026) – स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे 02 ते 06 एप्रिल, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
               चमूंमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा भूषण गेडाम, कुणाल शिखरे, यश सदांशिव, कौशिक गेहलोत व प्रथमेश माहोरे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदराचा रोहण बरकरे, आदित्य राऊत, सुबोध धंदर व राधेय अकर्ते, स्व. एन.ए. देशमुख महाविद्यालय, चांदुरबाजारचा मयुर खंडारे, स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालय, नांदगांव पेठचा अंकुश शिरसाट, इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगांवचा ओम देशमुख व तेजस भालेराव, रामकृष्ण महाविद्यालय, दारापूरचा सुफियान खान पठाण व रोहण मेश्राम, महात्मा फुले महाविद्यालय, अमरावतीचा आदित्य नागदिवे, कला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकळचा आयुष बोरखडे, कला महाविद्यालय, बुलडाणाचा ज्ञाने·ार चिमकुरे, आर.ए. महाविद्यालय, वाशिमचा साहील राऊत आणि जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा अशोक नागले याचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावती येथे 21 ते 30 मार्च, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button