City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात पहाटेच्या लुटीचा उलगडा; सोन्याची साखळी हिसकावणारा आरोपी अटकेत

नागपूरमध्ये पहाटेच्या सुमारास घडलेल्या लुटीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. सिटी परिसरात एका व्यक्तीवर हल्ला करून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.


ही घटना नागपूर शहरातील इम्प्रेस सिटी गेट परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२६ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मेयो हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर जाण्यासाठी सिटी परिसरातून दुचाकीने जात होते.

दरम्यान, इम्प्रेस सिटी गेट ते लोटस शोरूम पॉईंट चौक दरम्यान दोन अज्ञात इसमांनी त्यांना धक्का देत खाली पाडले आणि मारहाण केली. त्यानंतर काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेल्या या दोघांनी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी राजेश उर्फ बाब्या नारायण उईके (वय २३ वर्ष, रा. नंदनवन परिसर, नागपूर) याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून फिर्यादीकडून लुटलेली २० ग्रॅम सोन्याची साखळी आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button