अ.भा. आंतर विद्यापीठ तायक्वांडो (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 20.02.2026) –
फकिर मोहन युनिव्र्हसिटी, व्यासा विहार, बालासोर येथे 16 ते 20 मार्च, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांडो (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. रोहिणी फाड, कु.साक्षी डहाके, कु. महेक बुंदेले, कु. अनामिका डेका व कु. नम्रता तायडे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. नुतन पुंड, गुलामनबी आझाद महाविद्यालय, बार्शीटाकळीची कु. पुनम काशिद आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर तायक्वांडो विभागाची कु. विद्या पुरी हिचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे 04 ते 13 मार्च, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



