अ.भा. आंतर विद्यापीठ तायक्वांडो (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 20.02.2026) – दाव युनिव्र्हसिटी, जालंधर येथे 16 ते 20 मार्च, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांडो (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा दिपेंद्रसिंह बिस्त, समीर सैफी, सुरज कुंटारे व आशुतोष सोळंके, पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावतीचा महेश जाधव व प्रणव जाधव, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा मनिष चेट्टरी, एस.एस.जी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेगांवचा प्रतिक वंदे याचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे 04 ते 13 मार्च, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



