AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठात सॉफ्ट स्किल विकास कार्यशाळा संपन्न, केमिकल टेक्नॉलॉजी व विद्यार्थी विकास विभागाचा उपक्रम

अमरावती (दि. 17.02.2026) – आजच्या स्पर्धात्मक युगात सॉफ्ट स्किलचे महत्त्व ओळखून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय सॉफ्ट स्किल विकास कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेत संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, संघटन कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढविणे यांसारख्या महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल्सवर विशेष मार्गदर्शन दिल्या गेले.
               उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केमिकल टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक, प्रमुख अतिथी म्हणून सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट आफिसर डॉ. पवन देशमुख, कार्यशाळेचे संयोजक डॉ. पी. बी. शिंगवेकर उपस्थित होते.
               डॉ. पवन देशमुख यांनी विद्यार्थी विकास विभागाच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व विषद केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. अनिल नाईक यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कौशल्य विकासावर कसा भर दिला जात आहे, याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. जवंजाळ, डॉ. कोकाटे, राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती, सुशीला सूर्यवंशी मनेजमेंट, अमरावतीचे डॉ. अमोल करमरकर या अनुभवी तज्ज्ञांचे विद्याथ्र्यांना  मार्गदर्शन मिळत आहे. प्रस्ताविकातून डॉ. प्रशांत शिंगवेकर यांनी कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट केली. संचालन कु. भारती हिने केले. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असून कार्यशाळेला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button