AmravatiLatest NewsSports

अ.भा. आंतर विद्यापीठ सर्वोत्कृष्ट शरीरयष्टी (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 16.02.2026)- आंध्रा युनिव्र्हसिटी, विषाखापट्टणम येथे 03 ते 04 मार्च, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सर्वोत्कृष्ट शरीरयष्टी (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
               चमूंमध्ये सिताबाई कला व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा निखिल उके व वेदांत ठाकरे, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाचा हर्ष कनोजिया, गुलामनबी आझाद महाविद्यालय, बार्शीटाकळीचा रेवित शिरसाट, नथमल गोयनका विधी महाविद्यालय, अकोलाचा क्रिष्णा बागेरे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा बिशाल कामी आणि प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराचा यश सरनिक याचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुल येथे 19 ते 28 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button