विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात नेताजी सुभाषचंद्र बोस व वं. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

अमरावती (दि. 27.01.2026) – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात थोर स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. के. बी. नायक, प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. के. यू. राऊत होते.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती, शौर्य, बलिदान तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमानिमित्त विभागातील विद्याथ्र्यांसाठी ‘भारतातील सामाजिक समस्या’ या विषयावर आधारित पोस्टर प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या पोस्टरमधून बेरोजगारी, दारिद्र¬, जातीय भेदभाव, स्त्री-पुरुष समानता, शिक्षण व आरोग्य अशा विविध सामाजिक समस्यांचे प्रभावी सादरीकरण केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. के. बी. नायक यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची राष्ट्रनिष्ठा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक जाणिवेचा आदर्श घेऊन संशोधन व समाजोपयोगी कार्यात योगदान देण्याचे विद्याथ्र्यांना आवाहन करुन प्रसिध्द अभिजात जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांच्या समाजशास्त्रीय सिध्दांताचा दाखला देत नेताजी सुभाष चंद्र बोस व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा लोकविलक्षण व्यक्तिमत्व असलेला नोता नामोल्लेख केला. कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस व वं.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण व विद्यापीठ गीताने झाली. याप्रसंगी विभागातील डॉ.रोहिणी देशमुख, प्रा.साधना इंगोले, प्रा. सुनिता इंगळे, डॉ. प्रशांत भगत, संशोधक विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री प्रवीण घर्डीणकर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



