AmravatiLatest NewsSports

अ.भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 27.01.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आयोजित व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे 06 ते 10 फेब्राुवारी, 2026 रोजी होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
               चमूंमध्ये शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीची कु. वैष्णवी गिरी व कु. रोहिणी इसळकर, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. क्षितिजा आठवले, कु. पल्लवी सदांशिव, कु. पल्लवी कोल्हे व कु. तेजस्विनी गुल्हाने, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. आकांक्षा वाघमारे, भारतीय महाविद्यालय, अमरावतीची कु. दिपाली ढोले व कु. तेजस्विनी गुळदे, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगांव सुर्जीची कु. साक्षी वानखडे, कु. अर्पिता गायगोले व कु. नितू नेमाडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. राधिका सिकची, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. सलोनी तसरे, विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची कु. राधिका दानखडे, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळची कु. मृणाल फुसाटे, रामकृष्ण महाविद्यालय, दारापूरची कु. पल्लवी जाधव, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अमरावतीची कु. तन्वी देशमुख, सरस्वती महाविद्यालय, दहिहांडाची कु. रिया डांगरे, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, बडनेराची कु.  गार्गी उगले आणि  श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. नितल जुनघरे हिचा समावेश आहे. निवड झालेल्या  चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे 28 जानेवारी ते 04 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button