AmravatiLatest NewsMaharashtra
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन१२ हजारांहून अधिक उमेदवार देणार परीक्षा

अमरावती, दि. 31 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा–2025 येत्या रविवारी, दि. 4 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
ही परीक्षा रविवार, दि. 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत एकाच सत्रात घेण्यात येणार आहे. अमरावती शहरात परीक्षेसाठी एकूण 41 परीक्षा उपकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण 12 हजार 864 उमेदवार प्रविष्ट होणार आहेत.
परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 1 हजार 250 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले असून उमेदवारांनी वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



