शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रा.अरुण बुंदेले यांच्या व्याख्यानाचे २७ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आयोजन

अमरावती : श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, फ्रेजरपुरा, अमरावती येथे शिक्षणमहर्षी – कृषिमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त दि.२७ डिसेंबर २०२५ ला समाज प्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष,कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,अमरावती.) यांच्या “डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची सामाजिक आणि शैक्षणिक विचारधारा” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी प्रा.अरुण बुंदेले शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती निमित्त विद्यार्थांना नोटबुक सस्नेह भेट देणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक मा.प्रवीण घोंगडे सर राहणार आहेत. असे श्री पवन गावंडे सर,उमाळे सर,राठोड सर,गवई सर,सरवटकर मॅडम, कुबडे मॅडम, माथने सर,सोळंके सर,शेंडे सर,खरबडे मॅडम यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.



