AmravatiLatest News

सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची EVM स्टोअर व प्रशिक्षण केंद्रांची पाहणी

अमरावती महानगरपालिकेतील आगामी सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी शहरातील सांस्कृतिक भवनआयटीआय कॉलेज येथे पाहणी केली.

या पाहणीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवन येथील EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) स्टोअर तसेच आयटीआय कॉलेजमध्ये उभारण्यात आलेल्या निवडणूक प्रशिक्षण केंद्राचा सविस्तर आढावा घेतला. EVM स्टोअरमधील सुरक्षितता, यंत्रांची योग्य साठवणूक, सीसीटीव्ही निगराणी, प्रवेश नियंत्रण व्यवस्था आणि यंत्रांची तपासणी याबाबत त्यांनी सखोल निरीक्षण केले.

मतदान प्रक्रियेत EVM यंत्रांची अचूकता व सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असल्याने आयुक्तांनी विशेषतः EVM सुरक्षेवर भर दिला. स्टोअरमधील सुरक्षा उपायांची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या व निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.

यानंतर आयुक्तांनी आयटीआय कॉलेज येथे होणाऱ्या निवडणूक प्रशिक्षण व्यवस्थेची तपासणी केली. प्रशिक्षण केंद्रातील बैठक व्यवस्था, तांत्रिक साधने, प्रशिक्षण सत्रांची रूपरेषा तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा यांचा त्यांनी आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचे योग्य व वेळेत प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत, शहरातील प्रत्येक EVM स्टोअर व प्रशिक्षण केंद्राची नियमित पाहणी केली जाईल, असे सांगितले. यामुळे मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा सुरक्षित व पारदर्शक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पाहणीमुळे अमरावती शहरात सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेली EVM व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची तयारी उच्चस्तरीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची देखरेख ही निवडणुकीच्या पारदर्शक व सुरळीत आयोजनाची हमी देणारी ठरत आहे.

पाहणीदरम्यान उपस्थित अधिकारी :
अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उपअभियंता सुहास चव्हाण, अभियंता राजेश आगरकर, सुधीर गोटे आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button