AmravatiLatest NewsMaharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ प्रदान

अमरावती |
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पत्रकार परिषदेत आज जाहीर करण्यात आले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात येणार आहे.


पुरस्काराचे स्वरूप

या पुरस्कारात रु. पाच लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ यांचा समावेश आहे. हा सन्मान २७ डिसेंबर २०२५ रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या १२७व्या जयंती उत्सवाच्या मुख्य समारंभात देण्यात येणार असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याची मान्यता दिली आहे.


मुख्य समारंभ आणि प्रमुख उपस्थिती

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या समारंभात उपस्थित राहणार आहेत:

  • महाराष्ट्राचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे
  • शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. पंकज भोयर
  • राज्यसभा सदस्य मा. खासदार डॉ. अनिल बोंडे
  • अमरावतीचे खासदार मा. बळवंत वानखडे
  • आमदार मा. सौ. सुलभाताई खोडके, मा. श्री. संजय खोडके, मा. श्री. प्रताप अडसड, मा. श्री. रणधीर सावरकर

कृषी पुरस्कार आणि क्रीडा पुरस्कार

  • शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार २०२५ (दाननिधीतून, रु. १,११,१११/-)
  • स्व. शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार (दाननिधीतून, रु. १,११,१११/-)
  • डॉ. पंजाबराव देशमुख क्रीडारत्न पुरस्कार – श्रीमती विमलाबाई देशमुख अभ्यासवृत्ती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासवृत्ती, आणि कु. भक्ती गजानन चौधरी

जयंती उत्सवाचे विविध उपक्रम

  • कृत्रिम अंगारोपण ‘जयपूर फुट’ शिबिर (१८ ते २७ डिसेंबर २०२५) – आतापर्यंत ६०० गरजूंची नोंदणी
  • आंबा परिषद २०२५ – उद्घाटन मा. दत्तात्रय भरणे, प्रमुख अतिथी: डॉ. शरद गडाख, डॉ. विलास खर्चे
  • श्री शिवाजी हायस्कूल शताब्दी महोत्सव – उद्घाटन २२ डिसेंबरला, प्रमुख पाहुणे: सौ. सुलभाताई खोडके, श्री. संजय खोडके
  • डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला – २३ ते २५ डिसेंबर, वक्ते: श्री. जयदीप हर्डीकर, श्री. अविनाश पाटील, डॉ. दीपक पवार
  • चित्रकला व पुष्प प्रदर्शनी

पत्रकार परिषदेत उपस्थित अधिकारी व सदस्य

संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष ए. जे. व्ही. पाटील पूसदेकर, कोषाध्यक्ष श्री. दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य श्री. हेमंत काळमेघ, प्रा. सुभाषराव बनसोड, सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉ. अमोल महल्ले, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर देशमुख, प्रसिद्धी सचिव डॉ. कुमार बोबडे उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button