AmravaticitynewsLatest News

अमरावती रेल्वे उड्डाणपूल आणि स्टेशन बचाव लढा संसदेत पोहचला; खासदार वानखडे यांनी मुद्दा उपस्थित केला

अमरावती — शहराच्या ऐतिहासिक धरोहरांपैकी एक राजकमल रेल्वे उड्डाणपूल आणि मूळ अमरावती रेल्वे स्टेशन वाचवण्यासाठी सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यात पोहचला आहे. सिटी न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम आज थेट संसदेच्या अधिवेशनात दिसून आला.

संसदेतील आवाज

लोकसभा खासदार बळवंत वानखडे यांनी उड्डाणपूलाच्या जीर्ण अवस्थेबाबत आणि रेल्वे स्टेशन दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या प्रस्तावाविरोधात संसदेत ठोस आवाज उठवला. खासदारांनी ब्रिटिश काळीनं बांधलेला हा पूल असून, भूमाफियांचा कट असल्याचे गंभीर आरोपही सभागृहात मांडले.

याआधी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोन्डे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूल कोसळण्याच्या आणि स्टेशन दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या योजनांविषयी माहिती दिली होती.

सिटी न्यूजचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

सिटी न्यूजने हा विषय सर्वप्रथम उचलला आणि त्यावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत अमरावतीची धरोहर वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. पत्रकार परिषद, रेल्वे मंत्र्यांना निवेदन सादर करणे आणि अखेरीस संसदेत मुद्दा उपस्थित करणे — या सर्व प्रक्रियेत सिटी न्यूजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

लोकांचा प्रतिसाद आणि पुढील वाटचाल

सिटी न्यूजच्या माध्यमातून जनता दरबार आयोजित करून अमरावतीकरांच्या प्रतिक्रियाही घेतल्या गेल्या. मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्यामुळे ही चळवळ आणखी बळकट झाली आहे. सिटी न्यूजने स्पष्ट केले की या लढ्याचा उद्देश फक्त अमरावतीचा राजकमल रेल्वे उड्डाणपूल आणि मूळ रेल्वे स्टेशन बचावणे हाच आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button