AmravatiLatest News

अ.भा. आंतर विद्यापीठ योगा (पुरुष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 03.12.2025) – वेल्स इन्स्टिट¬ुट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अॅन्ड अॅडव्हान्स स्टडिज, पल्लवरम कॅम्पस, चेन्नई येथे  18 ते 22 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगा (पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
              चमूंमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा यश राठी, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी महाविद्यालय, शेंदुरजनाघाटचा रुद्रेश लोखंडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा हर्ष त्यागी, दर्शन जाधव, यश उमेकर व सर्वेश डांगे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा सुरज वैद्य, स्व. सी.एम. कढी कला महाविद्यालय, परतवाडाचा ओम इंगोले व साई शेंडे याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 06 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button