AmravaticitynewsEducation NewsLatest News

श्री दादासाहेब गवई स्मारकाकडे शाळा-महाविद्यालये आणि नागरिकांचा मोठा कल

अमरावती, २४ नोव्हेंबर २०२५: श्री रा.सु. (दादासाहेब) गवई स्मारकाच्या उद्घाटनानंतर शहर आणि खेड्यापाड्यातील नागरिक, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच दादासाहेबांचे चाहते स्मारकाकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. सुटीच्या दिवशी पालक आपल्या पाल्यांसह स्मारकाला भेट देऊन दादासाहेबांचे व्यक्तित्व आणि कार्य आपल्या पाल्यांसमोर मांडत आहेत, जेणेकरून त्यांच्या विचारांचे व कार्याचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहचेल.

दादासाहेब गवई यांनी आयुष्यभर समाजसेवेची झेप घेत राज्य विधानपरिषद आणि संसदेत समाजाच्या उत्थानासाठी आवाज उठवला. त्यांची विविध ठिकाणी दिलेली भाषणे स्मारकामधील स्मृति केंद्रात संग्रहित केली गेली असून, स्मारकाला भेट देणारे विद्यार्थी आणि नागरिक श्रवणयंत्राव्दारे ही प्रेरणादायी भाषणे ऐकून समाजासाठी त्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्मारकाचे संपदा व्यवस्थापक श्री धम्मदीप गवई यांनी नागरिकांना स्मारकाबद्दल माहिती दिली. विशेष म्हणजे स्मारकाचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून, सौंदर्याने नटलेला आहे. भेट देणारे विद्यार्थी व नागरिक या परिसराचे सौंदर्य पाहून आनंदित होत आहेत.

स्मारकाच्या माध्यमातून दादासाहेबांचे विचार आणि समाजसेवेची शिकवण पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button