AmravatiLatest News

गो. से. महावियालयात १९८२ च्या बी. कॉम. बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव च्या वतीने दिनांक २२  नोव्हेंबर २०२५  रोजी स्व. शंकरराव  बोबडे सभागृह,  गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव  येथे १९८२ च्या बी. कॉम. च्या विद्यार्थ्यांकरिता माजी विद्यार्थी मेळावा २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ४५  ते ५०  माजी विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. धनंजय तळवणकर, प्राचार्य, गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव यांनी भूषवले, प्रमुख अतिथी विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष शंकरराव (दादासाहेब) बोबडेहे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. आकाशजी अग्रवाल (सचिव, माजी विद्यार्थी संघटना),  डॉ. महेश गायकवाड, समन्वयक, माजी विद्यार्थी संघटना तसेच डॉ. लक्ष्मण  करंगले, समन्वयक, १९८२ बी. कॉम. बॅच हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. डॉ. लक्ष्मण करंगले यांनी प्रास्ताविकात 1982 च्या बॅचच्या उपक्रमांचा आढावा मांडला. प्राचार्य डॉ. धनंजय  तळवणकर यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. मुख्य अतिथी डॉ. दादासाहेब  बोबडे  यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात माजी विद्यार्थ्यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. श्री. आकाशजी  अग्रवाल  यांनी माजी विद्यार्थी संघठनेच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. महेश  गायकवाड यांनी माजी विद्यार्थ्यांचे सहभाग आणि योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील संस्मरणीय क्षण, उद्योग-व्यवसायातील अनुभव आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन केले. सांस्कृतिक कार्यक्रम, परस्पर संवाद सत्र आणि अनुभव कथन ही कार्यक्रमातील ठळक वैशिष्ट्ये होती. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. रोहिणी धरमकर यांनी केले व शेवटी आभार  प्रदर्शन श्री. किशोर बापट यांनी केले कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी सातत्याने जोडलेले राहण्याचा संकल्प व्यक्त केला. याप्रसंगी प्रा. डॉ. देवनंदन अढाऊ, डॉ. जयंत पोरे, डॉ. हनुमंत भोसले, प्रा. पाटील, श्री. लक्ष्मण पालवे, यश मोरे, लक्ष्मण भोपळे आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button