Latest NewsLaturMaharashtra

बाप-लेकाच्या निघृण खूनाचा पोलिसांनी फक्त ८ तासांत लावला छडा

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रुद्धा शिवारात ३ ते ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली. स्वतःच्या शेतातील आखाड्यावर झोपलेले शिवराज निवृत्ती सुरनर (वय ७० वर्षे) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर (वय २० वर्षे) या बाप-लेकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा निघृण खून केला. या घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपास जलद गतीने करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रायबोले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि अहमदपूर पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाचा बारकाईने तपास करून साक्षीदारांचे जबाब, आणि मृत व्यक्तींचे वैयक्तिक वाद यांचा सखोल अभ्यास केला. तपासात जमिनीच्या वादातून हा दुहेरी खून घडल्याचे निष्पन्न झाले. फक्त आठ तासांत पोलिसांनी संशयितांचा शोध घेत अत्यंत कौशल्याने दोघा आरोपींना अटक केली. नरसिंग भाऊराव शिंदे (वय ६० वर्षे) आणि केरबा नरसिंग शिंदे (वय २३ वर्षे) हिअटक केलेले आरोपी आहेत, दोघेही रा. करेवाडी, ता. लोहा, जि. नांदेड येथील रहिवासी आहेत. आरोपींना पोलिस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे. फक्त आठ तासांत दुहेरी खुनाचा छडा लावून आरोपींना अटक करणाऱ्या अहमदपूर पोलिसांच्या या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button