श्री राणी सती मंदिर सतीधाम अन्नकूट महोत्सव

अमरावती – दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीतील श्री राणी सती मंदिर सतीधाम परिसरात भक्तीभावाने अन्नकूटाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सकाळपासून मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. राणी सती मातेला अर्पण केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ सुंदर पद्धतीने सजवून ठेवले होते.
भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर प्रसादरूपाने अन्नाचा लाभ घेतला. हा अन्नकूट कार्यक्रम केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकतेचं प्रतिक ठरतो.
या आयोजनात मंदिराचे सर्व सदस्य मनापासून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष परेश भाई साहब, बीकू भैया अग्रवाल, हरीश अग्रवाल, अजय अग्रवाल, पवन जी शर्मा, अल्पेश पटेल, श्याम गुप्ता, अभिषेक महर्षि, मोहन बरसिया, अमित जायसवाल यांच्यासह संपूर्ण सतीधाम परिवाराने एकत्र परिश्रम घेतले. भक्तीभावाने सजलेल्या या अन्नकूट महोत्सवात भक्तांनी एकत्रित भोजन करत, श्रद्धा आणि प्रेमाने राणी सती मातेला नतमस्तक झाले.
कार्यक्रमादरम्यान भाविकांनी भजन, आरती आणि दिपदानाद्वारे आपली श्रद्धा व्यक्त केली. अन्नदान हेच सर्वोत्तम दान या भावनेने सतीधाम परिवाराने ही परंपरा यशस्वीपणे जपली आ



