Uncategorized

चांदूरबाजारच्या कैलास कठाळे यांचा वाराणसीत आंतरराष्ट्रीय ज्योतिष सन्मान

वाराणसीत १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी काशी हिंदू विद्यापीठाच्या महान सभागृहात दोन दिवसांचा आंतरराष्ट्रीय ज्योतिष व वास्तु संमेलनाचे आयोजन झाले.
संमेलनात ‘भारतीय ज्योतिषशास्त्राचा आधुनिक स्वरूपात वापर’ आणि ‘वास्तुशास्त्राचे वैज्ञानिक परीशिलन’ या दोन महत्त्वाच्या विषयांवर जागतिक स्तरावर विचारमंथन करण्यात आले. विद्वानांनी आपले संशोधनपत्र सादर करून भारतीय ज्ञानपरंपरेचा गौरव वाढविला. चांदूरबाजारचे भूमिपुत्र कैलास कठाळे यांनी ‘भारतीय ज्योतिषाचा आधुनिक जीवनातील वापर’ या विषयावर आपले संशोधनपत्र सादर केले. त्यांच्या संशोधनात वटसावित्री व पितृपंधरवडा यांचा परस्पर संबंध आणि ज्योतिषशास्त्राचा आधुनिक विज्ञानाशी सुसंगत वापर याचा सखोल अभ्यास समोर आला. संमेलनात ज्योतिष विभाग प्रमुख प्रा. शत्रुघ्न त्रिपाठी, प्रा. विनयकुमार पांडेय, तसेच मा. शारदा ज्योतिषधाम संस्थेचे अध्यक्ष पं. दिनेश गुरुजी आणि पं. योगेंद्र महंत यांनी कैलास कठाळे यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवले. कैलास कठाळे यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितले की, ‘काशी हिंदू विद्यापीठात देश-विदेशातील विद्वानांच्या सानिध्यात ज्ञानाचा अनुभव घेणे हे मोठे भाग्य आहे. एखाद्या विशिष्ट शाखेत प्राविण्य मिळवून त्यावर सखोल अभ्यास करणे हेच आजच्या काळाची गरज आहे.’
चांदूरबाजार व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कैलास कठाळे यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button