Uncategorized

खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते “माझ्या आठवणीतील माणसं आत्मचरित्राचं” प्रकाशन

नांदेड – नांदेडच्या माहूरमध्ये शनिवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बालाजी मंगलमच्या सभागृहात एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण साकारला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे यांच्या “माझ्या आठवणीतील माणसं” या आत्मचरित्राचं प्रकाशन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना खा. चव्हाण यांनी सांगितलं की,
“नामदेवरावांना आमदार करता आलं नाही, ही एक खंत आजही वाटते. पण त्यांनी आपल्या कार्यातून जी माणसं जोडली, तीच त्यांची खरी संपत्ती आहे.”
या कार्यक्रमाला आमदार भीमराव केराम, आमदार विक्रम काळे, आमदार किसनराव वानखेडे, माजी खासदार भास्करराव पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अमरनाथ राजूरकर, प्रवीण पाटील चिखलीकर, किशोर देशमुख तसेच प. पु. श्यामबापू भारती महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर केशवे परिवाराने सर्व मान्यवरांचा सत्कार केला. या वेळी प्रा. राजेंद्र केशवे यांनी प्रास्ताविक मांडले, तर बाबाराव केशवे यांनी आभार मानले.
व्यासपीठावरून प्रल्हाद गावंडे, शिवराज राघू मामा, आमदार भीमराव केराम, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री भास्करराव पाटील आदींनी नामदेवरावांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाला उजाळा देत गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना नामदेवराव केशवे यांनी आपल्या कार्यकाळात साथ दिलेल्या सर्वांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला नामदेवरावांना मानणारे असंख्य अनुयायी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button