Uncategorized

आरटीओचे बस तपासणीदरम्यान अवाजवी तिकीट दरांवर नियंत्रण

अमरावती – अमरावती विभागीय परिवहन कार्यालयाच्या सर्व फिरत्या पथकांकडून सध्या बस तपासणी मोहीम सुरू आहे. दिवाळीच्या काळात लांब पल्याच्या स्लीपर बसकडून अवाजवी तिकीट दर आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहिम राबविली. या कारवाईत काही बसमध्ये मालवाहतूक, काही वाहनांमध्ये चालकांकडे आवश्यक परवाने नसल्याचे आढळले, तर काही ठिकाणी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन झाल्याने दोषींवर कारवाई करण्यात आली. सिटी न्यूजचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता तपासणी मोहिमेची सविस्तर माहिती घेण्यात आली. तपासणीदरम्यान चार बसची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी कोणत्याही बसकडून जास्त तिकीट दर आकारले गेल्याचे आढळून आले नाही.
ही मोहीम मोटार वाहन निरीक्षक श्री. येनारे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. दहिकर, तसेच श्री. मोहम्मद अतहर आणि चालक श्री. झटाले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. आरटीओकडून अशी तपासणी मोहीम दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांना न्याय मिळावा आणि नियमबाह्य वसुलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केली जात आहे. प्रवाशांनीही आपले हक्क जाणून प्रवासादरम्यान कोणतीही अवाजवी मागणी झाल्यास त्वरित आरटीओकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button