AmravatiEducation NewsLatest News

पुणे करार आरक्षणाचे फलित-डॉ. विकास जांभुळकर विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राची पुणे करार दिनानिमित्त व्याख्यानमाला


अमरावती – (दि. 03.10.2025) :  राजकारणातून नैतिकता पाळली गेली असती, तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले असते. मात्र तसे झाले नाही आणि त्याचेच फलित आरक्षणात झाले, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. विकास जांभुळकर यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने पुणे करार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमाला प्रसंगी   ‘पुणे करार : नैतिकता व राजकीय प्रतिनिधित्व’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
                  डॉ. जांभुळकर म्हणाले, भारतीय राजकारणाचं मूळ शोधण्याची आज गरज आहे. संख्याबळ अधिक असले, तर त्यांच्याकडून न्याय मिळेलच याची शा·ाती देता येत नाही. अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व सुध्दा अस्पृश्यांनीच करावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ठाम भूमिका होती. जातीव्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सतत लढा सुरू होता. 1932 च्या करारातून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना पुढे आली मात्र, त्याला महात्मा गांधींनी विरोध केला. महात्मा गांधी आणि मदनमोहन मालवीय यांच्या विरोधातून पुणे करार झाला व आरक्षण ही नवी संकल्पना पुढे आली, असेही ते म्हणाले.
                  प्रमुख अतिथी डॉ. नितीन कोळी म्हणाले, 1919 च्या कायद्याचे दर दहा वर्षांनी पुनरावलोकन होणे गरजेचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिाटीश सरकारचे मन वळवले व आपली मागणी मान्य करुन घेतली. आज जे संविधान आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, त्यात डॉ. बाबासाहेबांचा कित्येक वर्षांपासूनचा संघर्ष आहे.
अध्यक्षीय भाषणातून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, व्याख्यात्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या विषयाची मांडणी केली आहे व यानिमित्ताने पुणे करारामागील परिस्थिती देखील व्याख्यानाच्या माध्यमातून कळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक असे संविधान देशाला दिले आहे. संविधानामुळेच आज देश एकसंध असून डॉ. बाबासाहेबांना यासाठी किती संघर्ष करावा लागला असेल, याची कल्पना येते.
                   संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व मेणबत्ती प्रज्वलित करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकेतून डॉ. संतोष बनसोड यांनी आयोजनामागील भूमिका सांगितली. सूत्रसंचालन प्रा. जगदीश गोवर्धन यांनी, तर आभार डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी मानले. व्याख्यान कार्यमाक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button