तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत गो. से कनिष्ठ महाविद्यालयाचा दबदबा कायम अनेक विद्यार्थ्यांना जिल्ह्यात व विभागात प्रतिनिधित्व करण्याची संधी

खामगाव: स्थानिक शालेय तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गो. से. कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये आपला दबदबा कायम ठेवला असून यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाचा संघ तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनेक स्पर्धेत प्रथम येऊन जिल्ह्याचे नेतृत्व व विभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बॅडमिंटन मध्ये मुलीच्या संघाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला असून तालुक्याचे नेतृत्व जिल्ह्याच्या ठिकाणी संघ करणार आहे. बुद्धिबळामध्ये अंडर-१९ या गटात यश मोहन वानखडे याने तालुक्यातून प्रथम क्रमांक तर मुलीमध्ये अंडर -१९ या गटात कु. यशदा दीपक महाजन हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जुदो आणि वूशू या क्रीडा प्रकारात कु. सुपेक्षा रामधन खांजोडे हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्तरावर निवड झाली. मंजीत शिवनाथ भूतीयांनी ह्या विद्यार्थ्याने स्विमिंग ह्या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकवात गोल्ड मेडल मिळवले व विभागस्तरावर निवड झाली. सपॅक टकरा या स्पर्धेत मुलांच्या संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला व विभाग स्तरावर निवड झाली. आयुष राजेश मारोडे ह्या विद्यार्थ्याने U-19 कुडो या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.तसेच पावर लिफ्टिंग मध्ये महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी देवेश नामदेव अंबूस्कर व राज माणिकराव दांडगे यांनी जिल्हास्तरावर सहभाग नोंदविला. तसेच कबड्डी मुली या क्रीडा प्रकारात विद्यार्थिनी तालुकास्तरावर उपविजेत्या राहिल्या. बॅडमिंटन मुले तालुका स्तरावर उपविजेते राहिले. या सर्व विद्यार्थ्यांचे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव चे अध्यक्ष आदरणीय श्री. डॉ. सुभाष बोबडे, उपाध्यक्ष आदरणीय श्री. प्रकाशजी तांबट तसेच सचिव डॉ. प्रशांत जी बोबडे व सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सर, उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे सर विभाग प्रमुख प्रा. सुभाष वाघ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व जिल्हास्तरावर व विभागीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या सदर यशा प्रत विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी क्रीडा शिक्षक प्रा. डॉ. अनुराग बोबडे व प्रा. धर्मराज मोगल, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयचे प्रा. पी. डी. कायपेल्लीवार, प्रा. डॉ. अर्चना कुलकर्णी, प्रा. अशोक ढाले, प्रा. धीरज मोहिते, प्रा. सोनाली कोल्हे, प्रा. अरविंद गोमासे, प्रा. विनोद डाबरे, प्रा. गौरी पाटील, प्रा. डॉ. अनिता कामटेकर, प्रा. मधुरा शिंगाडे व शिक्षकेतर कर्मचारी श्री. अभय मोहिते, श्री. तांगडे, श्री. भिसे, श्री. वानखडे, श्री. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



