AmravatiEducation NewsLatest News

गो. से. महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न

वैष्णवी हगवणे हीने प्रथम बक्षिस पटकविले

खामगाव –  विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचलित गो. से. महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.‌ संस्थेचे माजी अध्यक्ष खामगाव रत्न स्वर्गीय ॲड. भाऊसाहेब बोबडे यांच्या १११ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून संस्थेचे सदस्य डॉ. नंदकिशोर महाल्ले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी .एस . तळवणकर, तर‌ प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे माजी उपाध्यक्ष अशोकजी झुनझुनवाला, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे, सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे, उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे, जयंती उत्सव समितीच्या समन्वयक डॉ. डी .एन. व्यास, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा घेण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा दरवर्षी स्वर्गीय शंकरराव बोबडे उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती सप्ताह निमित्त घेतली जात असते. या स्पर्धेला राज्यातून विविध महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यातील नागपूर, जळगाव, नांदेड, जालना अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर इत्यादी ठिकाणाहून महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या वादविवाद स्पर्धेचा विषय “लोकशाहीतील आंदोलने तारक की मारक”? असा होता. अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाच्या अनुषंगाने वाद प्रतिवाद घातला या स्पर्धेचे प्रथम बक्षीस रू.६०००/ अकोला येथील विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. वैष्णवी संतोष हागोने हीने पटकविले. तर दुसरे बक्षीस रूपये ४००० चे रितेश अजय तिवारी नागपूर, याला मिळाले. तिसरे बक्षीस रुपये २०००/चे आदित्य महादेव टोळे आर. डी. आय. के महाविद्यालय अमरावती याने मिळविले. उत्तेजनार्थ दोन बक्षिसे देण्यात आली त्यामध्ये आरडीजी कॉलेजची विद्यार्थिनी कु. अंकिता पांडुरंग कांगरे व जालना जिल्ह्यातील परतुर येथील एलबीएस कॉलेजचा विद्यार्थी चैतन्य अंबादास नवल याला देण्यात आले. या बक्षीस वितरण सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून संस्थेचे माजी उपाध्यक्ष अशोकजी झुनझुनवाला उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून वादविवाद स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.  उद्घाटन प्रसंगी डॉ. महल्ले यांनी उपस्थित स्पर्धकांना स्वर्गीय भाऊसाहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती करून दिली. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी सांगितले की, स्वर्गीय भाऊसाहेब बोबडे  हे पश्चिम विदर्भातील एक‌ शिक्षण प्रेमी व समाजकारणी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अनमोल योगदानातून ही गो. से. महाविद्यालय रुपी ‌ज्ञानाची गंगा पश्चिम विदर्भात उभी राहिली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जीवनाला उंचावण्यासाठीच अशाच प्रकारच्या स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. या राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना स्पर्धेचे समन्वयक प्रा. विक्रम मोरे यांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हक्काचं सांस्कृतिक व्यासपीठ राज्यस्तरावर उपलब्ध करून देण्याच्या हेतूने ही स्पर्धा गेल्या दहा वर्षापासून गो. से. महाविद्यालय राबवत आहे. या स्पर्धेसाठी दरवर्षी नवनवीन ज्वलंत विषय ठेवण्यात येत असतात. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणाची तालीम अशा स्पर्धेतून होत असते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे. विद्यार्थी केवळ शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकत नाहीत. तर विद्यार्थ्यांचा नेतृत्व गुणाचा विकास झाली पाहिजे हा विचार स्वर्गीय भाऊसाहेब बोबडे यांच्या होता. त्यांच्या विचाराचा वारसा अविरतपणे सुरू राहावा हाच हेतू‌ राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या आयोजना मागे आहे. असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. मनोहर वासनिक, डॉ. किशोर वानखडे, डॉ. गणेश भरगडे यांनी निःपक्षपणे मूल्यमापनाचे कार्य केले. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. गायत्री एकडे हीने तर आभार प्रदर्शन अपेक्षा शिरसाठ हिने केले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रा. व्हि. यु. मोरे‌, प्रा. कैलास वैराळे, प्रा. शेखर खडसे, बी.ए. च्या व बी.कॉम.च्या विद्यार्थिनी कष्ट घेतले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा. डी. एस. भुतेकर यांनी केले. या स्पर्धेला प्रा. डॉ.  जयंत पोरे, प्रा. डॉ. हनुमंत भोसले, प्रा. डॉ. डी. टी. आढाव‌, डॉ. बी. एम. टकले, प्रा. डॉ. आर. आर. गव्हाळे, डॉ. एस. टी वराडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने‌ उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button