रासगरबा मध्ये पंजाबी थिमवर युवक – युवतीचा जोरदार पंजाबी गरबा

अंबा महाकुंभ गरब्यामध्ये नवनवीन कार्यक्रमाचे आयोजनचौथ्या दिवशीच्या रासगरब्याला अमरावती जिल्हयाचे माजी पालकमंत्री श्री.सुनिल देशमुख, सौ.सावित्री गंगाधर राणा, दैनिक मंडलचे अनिल अग्रवाल, माजी महापौर मिलींद चिमोटे, समाजसेवक चंद्रकुमार जोजोदिया, किशोर गोयनका, श्यामलाल खत्री, राजेश तरडेजा, कैलास गिरोळकर, संजय तिरथकर यांची विशेष उपस्थितीअमरावती – संपूर्ण अमरावती शहरामध्ये अंबा महाकुंभ रासगरबा भाग – 2 हा प्रसिध्द असून या रासगरब्याला भेट देण्याकरीता व खेळण्याकरीता युवक व युवती तसेच नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे आयोजकांच्या वतीने रासगरबाच्या वेगवेगळया थिम घेवुन नागरीकांना आकर्षीक करण्यात येत आहे.रासगरब्याच्या चौथ्या दिवशी पंजाबी वेशभुषा रासगरब्याची थिम घेण्यात आली होती. या पंजाबी थिमच्या रासगरब्याला अमरावती शहरातुन हजारो युवक – युवती व नागरीकांनी उपस्थिती दर्शविली व रासगरब्याचा आनंद घेतला.दररोज येवुन रासगरबा खेळणाऱ्या स्पर्धाकांवर आयोजकांच्या वतीने हजारो रुपयांचा बक्षीसांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे या रासगरब्याला नवरात्रीच्या नऊ दिवसात जास्तीत जास्त नागरीकांना आनंद घेता येईल असे आयोजन समितीच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे. या संपूर्ण रासगरब्याला यशस्वी करण्याकरीता अनुपमा राणा, स्नेहल गुल्हाने, नितु गोयनका, श्वेता तन्ना, पुजा बोरकर,मयुरी सेठीया, कविता मंत्री, संगीता सावळे, शितल पिवाल, वर्षा लुल्ला, प्रित संतवानी, रेणु खत्री, रीया नांदवानी, सोनल नांदवानी, पिंकी चांदवानी, रोहीनी अनासाने, प्रिती रेवणे, सुनिल राणा, नितीन अनासाने, राहुल बजाज, मनोज चांदवानी, किशोर पिवाल, दिनेश सेठीया, दिनेश अग्रवाल, विनय तन्ना, अंकुश गोयनका, संदिप गुल्हाने, प्रविण सावळे, वैभव बजाज, नितीन बोरेकर, महेश मुलचंदानी, विजय मोटवानी, धिरज हिरानी, महेंद्र लायत, सागर मतानी, विश्वनाथ अरोरा, राजेश कटारीया, अजय बोबडे, मनोज डहाके, राकेश अहेजा, अंजय सोजरानी, हर्षल रेवणे, करण आश्रा, विनय राजानी यांनी परीश्रम घेत आहे.



