AmravatiLatest News
विद्यापीठात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

अमरावती – (दि. 25.09.2025)
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती मोठ¬ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी पंंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत विघे, प्राचार्य डॉ. दिपक राऊत, डॉ. विक्रांत वानखडे तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दल माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी दिली. संचालन जनसंपर्क विभागातील श्री सुनिल महल्ले यांनी केले.



