AmravatiLatest News

गो. से. महाविद्यालयात “दुर्मिळ विदेशी नाणे व चलन” प्रदर्शन उत्साहात संपन्न

खामगाव (प्रतिनिधी) विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो. से विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे ॲड.स्व. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे जयंती उत्सव – २०२५ या निमित्ताने ग्रंथालयाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स हॉल मध्ये “दुर्मिळ विदेशी नाणे व चलन” प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. अनिलजी व्यास (सदस्य,वि.शि.प्र.मंडळ,खामगाव), प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मा. प्रा. राजेशजी पाटील (आंतरराष्ट्रीय नाणे अभ्यासक) तसेच प्रा. सुनील मुळे, प्रा. पृथ्वीराज ठाकूर, प्रा. संदीप शिंदे हे उपस्थित होते. प्रास्ताविक पर संबोधणात प्रा. संदीप शिंदे यांनी ॲड. स्व. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली, तसेच नाणे प्रदर्शनाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रा. राजेश पाटील सर यांनी इतिहासात नाण्यांचे असणारे महत्त्व विशद करताना, नाणे राज्याच्या आर्थिक संपन्नतेचे प्रतीक समजले जाते, नाण्यांवरूनच इतिहासातील राजवंश,शासक यांच्या काळातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय तसेच सांस्कृतिक स्थिती समजण्यास मदत होते हे समजावून सांगितले, तसेच विविध देशांतील चलन व त्यांचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात ॲड. अनिलजी व्यास सर यांनी, ॲड. स्व. भाऊसाहेब बोबडे यांच्या आठवणींना उजाळा देत भाऊसाहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास किती प्रेरणादायी आहे हे उलगडून सांगितले. प्रा. पी. पी. ठाकूर यांनी ॲड. अनिलजी व्यास सर यांच्या कडून ग्रंथालयाला विविध ग्रंथाचा संच भेट दिल्याची घोषणा यावेळी केली. या ग्रंथामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानकोषात अधिक भर पडेल असा विश्वास व्यक्त केला.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. एस. वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आर. व्ही. ढाकणे यांनी केले. उद्घाटनानंतर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात २०० पेक्षा जास्त देशांतील दुर्मिळ नाणे/नोटा ठेवण्यात आल्या होत्या, तांबे, पितळ, मिश्र धातू सोबतच सोने आणि चांदीचे नाणे सुद्धा प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या वेळी ऑस्ट्रेलियाच्या १ किलो ७९ ग्राम चांदीच्या नाण्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सुभाषाजी बोबडे, उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशजी तांबट, सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, कोषाध्यक्ष मा. श्री. अजिंक्यजी बोबडे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेटी देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.या प्रदर्शनी साठी, ग्रंथपाल श्री. संजय गुलभेळे,प्रा. प्रदीप बानाईत, ग्रंथालय कर्मचारी श्री. गजानन सुरवाडे, श्री. प्रदीप मेटे, श्री. प्रशांत सोळंके यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्रा. डी. टी. आढाऊ, प्रा. कैलास वैराळे, प्रा. डॉ. जयेश तातेड, प्रा. योगेश महिसागर, डॉ. अरविंद तायडे, प्रा. ईश्वर कराळे, प्रा. बाळासाहेब टकले व इतरहि प्राध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सर, उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल उबाळे सर , डॉ. देवेंद्र व्यास सर व प्रा. एच. ए. भोसले सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.      

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button