Latest NewsMaharashtra

नवरात्रीचा पहिला दिवस, ग्राहकांना दिलासा की टेन्शन कायम? आज काय आहेत सोन्याचे दर, वाचा 10 ग्रॅमचा भाव

नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. काहीच दिवसांत भारतात दिवाळीची लगबग सुरू होणार आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव वाढले आहेत. तर, एकीकडे चांदीचीही झळाळी वाढली आहे.

यंदा सोनं आत्तापर्यंत 35,000 रुपयांपर्यंत महागलं आहे. तर चांदी 45,000 रुपयांनी महागली आहे. सातत्याने सोन्याचे दर वाढत असताना अनेकांनी सुरक्षित गुंतवणुक म्हणून दोन्ही मौल्यवान धातुंचा पर्याय निवडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीची चमक पाहायला मिळतेय. स्पॉट गोल्ड 1.1 टक्क्यांनी वाढून $3.683.24 प्रति औंसवर बंद झाले. या आठवड्यात सोनं 11 टक्क्यांनी वधारलं आहे. फेडरल रिझर्व्हच्या अलीकडच्या निर्णयामुळं सोनं-चांदीला मजबूती मिळाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 430 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,12, 580 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,03,200 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची वाढ झाली असून 84,440 रुपयांवर सोनं स्थिरावलं आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,03,200 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,12,580 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 84,440 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 10,320 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 11,258 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 8,444 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 82, 560 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 90,064 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 67, 552 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,03,200 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,12,580 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 84,440 रुपये

१. सोन्याचे दर का वाढत आहेत?
सोन्याचे दर वाढण्यामागे सणासुदीच्या काळातील वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, आणि फेडरल रिझर्व्हच्या अलीकडील निर्णयांचा प्रभाव आहे. स्पॉट गोल्ड 1.1 टक्क्यांनी वाढून $3,683.24 प्रति औंसवर बंद झाले आहे, तर या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

२. सोन्याची गुंतवणूक का लोकप्रिय आहे?
सणासुदीच्या काळात आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. सातत्याने वाढणारे दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चमक यामुळे अनेकजण सोन्याकडे गुंतवणुकीसाठी आकर्षित होत आहेत.

३. मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर इतर शहरांपेक्षा वेगळे का असतात?
सोन्याचे दर स्थानिक मागणी, पुरवठा, कर, आणि स्थानिक बाजारपेठेतील मध्यस्थांच्या शुल्कांवर अवलंबून असतात. तथापि, सध्या मुंबई आणि पुण्यातील दर वर नमूद केल्यानुसार एकसमान आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button