Latest NewsMaharashtra

पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तत्काळ अहवाल पाठवा….महसूल मंत्री तथा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

अमरावती : अमरावती विभागातील तीन जिल्ह्यात 1 ते 14 सप्टेंबर दरम्यान पाऊसामुळे शेतीपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप अंतर्गत तीन जिल्ह्यातील 16 तहसीलच्या 1068 गावात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये विभागातील अमरावती ,यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे.
या जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेती पिकाचे तत्काळ सर्वेक्षण करून आव्हाल पाठविण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आहे…

साधारतः अमरावती ,यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात 1 लाख 98 हजार हेक्टर क्षेत्रात पावसामुळे शेतीपिकाची नुकसान झालेले आहे ..या शेती पिकाचे तत्काळ सर्वेक्षण करून शासनाला पाठवण्याचे सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे…

सप्टेंबरच्या सुरूवातीस कमी पाऊस पडला आहे. यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान, धारणी, चांदुर बाजार आणि मोर्शी तहसील मध्ये पावसामुळे 60 गावां मध्ये नुकसान झाले आहे. या मध्ये सुमारे 2672.96 हेक्टर मध्ये नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे, यवतमाळ
जिल्ह्यातील7 तहसील मधील
व बुलढाणा जिल्हातील बुलढाणा, मलकापूर, शेगाव, नांदुरा तालुक्यातील गावा मध्ये नुकसान झाले आहे…

त्वरित सर्वेक्षण कराराज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी व महसूल विभागाला सूचना दिल्या आहेत… ज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करून शासनाला पाठवावे जेणेकरून शेतकरी बांधवांना लवकर भरपाई मिळवू शकतील. शेतपीक सर्वेक्षणात एक ही शेतकरी वंचित राहणार नाही.. याची दक्षता घेण्याची निर्देश यावेळी देण्यात आले…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button