Latest NewsMaharashtra
धक्कादायक! ७१ प्रवाशांसह विमानाचं चाक हवेत निखळलं; मुंबईत आपत्कालीन लँडिंग

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघातांच्या घटना वारंवार घडत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला. कांडला ते मुंबई या दिशेने येत असलेल्या स्पाइसजेटच्या SG2906 या Q400 विमानाचे चाक उड्डाणानंतर हवेतच निखळले. तरीदेखील विमानाने प्रवास सुरू ठेवत मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केले. विमानातील ७१ प्रवासी आणि दोन केबिन क्रू पूर्णपणे सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे चाक धावपट्टीवर आढळताच महिला पायलटने तातडीने विमानतळ अधिकाऱ्यांना कॉल करून आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. काही काळासाठी मुंबई विमानतळावरील उड्डाणे थांबवण्यात आली होती. मात्र विमान सुरळीतपणे उतरवण्यात आले आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला असून विमानतळ प्रशासनाने तातडीने सुरक्षा तपासणी सुरू केली आहे.



