Crime NewsLatest News

मंगरूळ दस्तगीर बायपासवर सोलर लाईट चोरी

मंगरूळ दस्तगीर : मंगरूळ दस्तगीर येथील बायपास रोड टी-पॉईंट परिसर हा मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असलेला मार्ग आहे. रात्रीच्या वेळी येथे अंधार असल्याने अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाने या ठिकाणी सोलर लाईट बसवला होता. मात्र अज्ञात चोरट्यांनी हा सोलर लाईट तोडून टाकला. चोरट्यांनी लाईटचा पाईप आराने कापून वायर, बॅटरी आणि लाईट चोरून नेले. सोलर प्लेट आणि खांब मात्र तिथेच पडलेल्या अवस्थेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून संताप व्यक्त केला आहे. जनहितासाठी बसवलेले लाईटच चोरट्यांनी उखडल्याने परिसर पुन्हा अंधारात गेल्याचे चित्र आहे. यामुळे अपघातांची शक्यता आणखी वाढली असून नागरिकांनी पोलिसांनी तात्काळ चोरट्यांना शोधून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button