अमरावती बस स्थानकावर पती-पत्नीचा वाद

अमरावती : अमरावती बस स्थानकाच्या बाहेर आज दुपारी तीन वाजता पती-पत्नीमध्ये जोरदार वाद सुरू झाला. पाहता पाहता हा वाद इतका वाढला की पतीने पत्नीला लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. ही धक्कादायक घटना पाहून आसपास असलेल्या काही ऑटो चालकांनी धाव घेत पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने संतापाच्या भरात त्या ऑटोचालकांनाही मारहाण केली आणि थेट म्हणाला – “माझ्या बायकोला मी काहीही करेन, तुम्ही मध्ये बोलणारे कोण?”
घटनास्थळी गोंधळ वाढत चालल्याने बस स्थानक परिसरात चांगलीच गर्दी झाली आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
दरम्यान, राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनीत कुलट यांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पती-पत्नीला शांत केले, ऑटो चालकांना घटनास्थळावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुनीत कुलट यांनी समुपदेशन करून पती-पत्नीचा वाद निवळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेमुळे बस स्थानकावर मोठा गोंधळ होण्यापासून परिस्थिती नियंत्रणात आली.



