India NewsLatest News

भारताच्या लष्करी ताकदीला बळकटी! DRDO च्या ULPGM-V3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने आपल्या संरक्षण क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) विकसित केलेल्या UAV-लॉन्च्ड प्रेसिजन गाईडेड मिसाईल (ULPGM)-V3 या क्षेपणास्त्राची आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य अचूक भेदत, त्याची कार्यक्षमता प्रभावीपणे सिद्ध केली.

संरक्षणमंत्र्यांकडून कौतुक
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, उद्योग संघटना, DcPPs, MSMEs आणि स्टार्टअप्सचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले, “ULPGM-V3 क्षेपणास्त्राच्या विकास व यशस्वी चाचणीबद्दल DRDO आणि उद्योगजगतातील सर्व भागीदारांचे मनःपूर्वक अभिनंदन. ही कामगिरी स्पष्टपणे दर्शवते की, भारतीय उद्योग आता महत्त्वाच्या लष्करी तंत्रज्ञानाच्या निर्मिती आणि आत्मसात करण्यासाठी पूर्णपणे सक्षम झाला आहे.”

ULPGM-V3: भारताच्या गाईडेड मिसाईल कार्यक्रमाचा महत्त्वाचा टप्पा
ULPGM-V3 हे क्षेपणास्त्र भारताच्या गाईडेड मिसाईल कार्यक्रमाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वी, ULPGM-V2 हे DRDO च्या टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅब (TBRL) मार्फत विकसित करण्यात आले होते, ज्यात अनेक प्रकारचे वॉरहेड्स होते.

ULPGM-V3 मध्ये इमेजिंग इन्फ्रारेड (IIR) सीकर्स आणि ड्युअल थ्रस्ट प्रपल्शन सिस्टम सारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आल्याची शक्यता आहे. यामुळे ही मिसाईल अधिक अचूक, वेगवान आणि प्रभावी झाली आहे. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके असून, विविध प्रकारच्या एरियल प्लॅटफॉर्मवरून डागता येते. ‘एअरो इंडिया 2025’ मध्ये या क्षेपणास्त्राची झलक पाहायला मिळाली होती, ज्याने त्यावेळीच जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

ही चाचणी कुरनूलमधील नॅशनल ओपन एरिया रेंज (NOAR) येथे पार पडली. ड्रोनवरून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने लक्ष्यावर अचूक मारा करत, भारतीय लष्करी संशोधन आणि उद्योगाची वाढती ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button