Latest NewsNanded
नांदेडमध्ये खुनाच्या आरोपींची पोलिसांकडून धिंड: गुन्हेगारीला वचक बसवण्याचा प्रयत्न

नांदेड : किरकोळ कारणावरून खून करून परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींची नांदेड ग्रामीण पोलिसांनी धक्कादायक दिंड काढली आहे. ही घटना नांदेड शहरातील खुदवे नगर भागात घडली, जिथे आरोपींची मोठी दहशत होती. मोहम्मद आमीर मोहम्मद गौस आणि मोईन खान पाशा खान अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
खुनाच्या घटनेनंतर या आरोपींनी खुदवे नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. पोलिसांनी या दोघांना अटक केल्यानंतर, त्यांची त्याच खुदवे नगर भागातून धिंड काढण्याचा निर्णय घेतला. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांच्या कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
या दिंडीमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांवर वचक बसेल आणि पोलिसांबद्दलचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



