Accident NewsAkolaLatest News

अकोला जिल्ह्यात भीषण अपघात: ट्रक-ऑटोची धडक, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू

अकोला : अकोल्यातील पातूर तालुक्यातील बाभूळगाव जवळ आज सकाळी एक भीषण अपघात घडला. ट्रकने प्रवासी ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली एक ऑटोरिक्षा बाभूळगावजवळून जात असताना एका भरधाव ट्रकने ऑटोरिक्षाला जबर धडक दिली. धडकेनंतर ऑटोरिक्षामधील काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावत जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असल्याची शक्यता
या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button