citynewsMaharashtraNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात दुचाकी चोरट्याला अटक; १.३० लाखांची चोरीची पल्सर जप्त!

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ ची कामगिरी; चौकशीत दोन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली, इतर आरोपींचा शोध सुरू

नागपूर, प्रतिनिधी : नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून विशेष प्रयत्न सुरू असताना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६ ने दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली आहे. सज्जल बंडूजी डोंगरे (वय २१, रा. प्लॉट क्रमांक ३२, वैष्णोदेवी नगर, कळमना, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीची सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतील इंदोरा परिसरात शिव मंदिरामागे अनिल राठोड यांच्या घरासमोर फिर्यादी सद्दाम शकील कुरेशी (वय २६) यांनी आपली बजाज पल्सर २२० दुचाकी (क्रमांक एमएच ४९ डी.एस. २०५७) लॉक करून पार्क केली होती. ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २ वाजतापासून १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६ च्या अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सज्जल डोंगरे याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांसह मिळून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीच्या ताब्यातून चोरीची बजाज पल्सर दुचाकी, अंदाजे किंमत १ लाख ३० हजार रुपये, जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला चोरीच्या दुचाकीसह जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवनिचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त दीपक अग्रवाल आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक भरत कन्हाडे, सपोनि सचिन गायकरवाड, सफौ. मुकेश खांडरे, पोहवा. भगवान बुधवंत, नारायण पारवेकर, चंद्रशेखर भारती, पोअं. रविंद्र राऊत, लक्ष्मीकांत सोनटक्के आणि राहुल पाटील यांनी सहभाग घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button