citynewsCrime NewsMaharashtraPune

पुण्यात जुन्या भांडणाच्या वादातून १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; चार विधिसंघर्षित बालके ताब्यात

फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ; लोखंडी हत्याराने डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातांवर वार करून संपवले जीवन

पुणे : पुणे शहरात जुन्या भांडणाच्या रागातून एका १७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेकराईनगर परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, करण रविंद्र नागटिळक (वय १७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सासवड रेल्वे स्टेशन ते संकेत विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावर, भोसले व्हिलेज, भेकराईनगर परिसरातील रेल्वे पटरीजवळ हा प्रकार घडला.

जुन्या भांडणाचा राग मनात धरून चार विधिसंघर्षित बालकांनी करण याच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. यावेळी लोखंडी हत्याराने त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि दोन्ही हातांवर वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करणचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. जुन्या भांडणातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अल्पवयीन मुलांमधील जुन्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येमागील नेमके कारण, हल्ल्याचे स्वरूप आणि इतर बाबींचा तपास फुरसुंगी पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button